Mon, Nov 19, 2018 18:53होमपेज › Pune › पुण्यात राहत्या घरात महिलेचा संशयास्‍पद मृत्यू

पुण्यात राहत्या घरात महिलेचा संशयास्‍पद मृत्यू

Published On: May 13 2018 11:56AM | Last Updated: May 13 2018 11:56AMवाकड : वार्ताहर

पुणे जिल्‍ह्यातील थेरगाव येथे राहत्या घरात एक महिला संशयास्‍पदरित्या मृतावस्‍थेत आढळली. प्रिया सुतार असे या ३५ वर्षीय महिलेचे नाव आहे. आज सकाळी ९ वा. सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत्यूचे कारण अस्‍पष्‍ट असून वाकड पोलिस तपास करीत आहेत. 

मृत प्रिया ही भाऊ किरणसह थेरगाव येथे राहत होती. आज, रविवारी सकाळी किरण याने शेजार्‍यांना प्रियाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वाकड पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्‍छेदनासाठी मृतदेह रुग्‍णालयात पाठविण्यात आला असून प्रियाचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा पोलिस शोध घेत आहेत.