Mon, Sep 24, 2018 15:07होमपेज › Pune › हिंदु जनजागृतीचा आरोप

सनबर्न आयोजकांनी केली करचुकवेगिरी

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:37AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांनी सरकारला प्रायोजकांबद्दल चुकीची माहिती पुरवून कोट्यावधींचा कर चुकविल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मिलिंद धर्माधिकारी यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, अ‍ॅड. मोहन डोंगरे आदी उपस्थित होते.  

यावेळी बोलताना धर्माधिकारी म्हणाले, मागील वर्षी सनबर्न फेस्टिव्हल महोत्सवात आयोजकांकडून प्रायोजकांबाबत खोटे प्रतिज्ञापत्र  रकारला सादर केले. यामुळे सरकारचा कोट्यावधींचा कर बुडाला आहे. 
याबाबत राज्याचे महसूलमंत्री, पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार करण्यात आली. मात्र,  तरीदेखील सरकार आणि प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई न करता उलट फेस्टिव्हलसाठी पायघड्या घालण्याचे काम केल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला.