Fri, Feb 22, 2019 18:17होमपेज › Pune › खा. सुळे यांनी घेतली रुग्णांची भेट

खा. सुळे यांनी घेतली रुग्णांची भेट

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 12:13AMधनकवडी : वार्ताहर 

भटकी कुत्री आणि त्यांचे सर्वसाधारण नागरिकांवर होणारे हल्ले या घटना वारंवार होत आहेत. त्यावर तोडगा काढणे हाच एकमेव उपाय आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.गेल्या आठवड्यात कात्रज येथील अंजनीनगर परिसरात कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या तीन वर्षीय आरोही रेणुसे व तिचे आजोबा साधु रेणुसे, कल्याणी गाढवे  या रूग्णांवर भारती हॉस्पिटल येथे उपचार करीत असलेल्या डॉक्टरांनी गेल्या तीन दिवसात केलेल्या उपचारांची माहिती त्यांना दिली. या तीनही रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या या रूग्णांच्या तब्बेतीची त्यांनी विचारपूस केली. तीनही रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. खा.सुळे यांनी आरोही या मुलींशी संवाद साधला. विश्रांती घे व लवकर बरी हो असा आधार त्यांनी तिला दिला. अशा घटना घडतात त्यावेळी प्रशासन तात्पुरत्या स्वरूपाची धावाधाव करते, नंतर सुस्तावते. मात्र याची मोठी किमत नागरिकांना मोजावी लागते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रूपाली चाकणकर, नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे, बाळाभाऊ धनकवडे, अश्‍विनी भागवत, स्मिता कोंढरे, युवराज बेलदरे उपस्थित होते.