Sun, Mar 24, 2019 10:47होमपेज › Pune › कर्जाला कंटाळून युवा शेतकर्‍याची आत्‍महत्या

कर्जाला कंटाळून युवा शेतकर्‍याची आत्‍महत्या

Published On: Jun 14 2018 3:59PM | Last Updated: Jun 14 2018 3:59PMभवानीनगर : वार्ताहर 

शिंदेवाडी (ता. इंदापूर जि. पुणे) येथील सतीश हरिश्चंद शिंदे (वय ३७) या शेतकर्‍याने कर्ज बाजारी पणाला कंटाळून बुधवारी (१३जून ) पहाटे पाच वाजता गळफास घेडन आत्महत्या केली.

 सतीश शिंदे यांना शिंदेवाडी येथे आठ ते नऊ एकर शेती असून या शेतीसाठी त्यानी बँकेकडून कर्ज घेतले होते. शिंदे यांनी भवानीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे चार वर्षापूर्वी वीस ते पंचवीस लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे तसेच वेळोवेळी येणार्‍या नैसर्गिक आपत्तीमुळे शिंदे यांना बँकेचे घेतलेले कर्ज फेडता आले नाही. उलट कर्जाच्या व्याजामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. बँकेकडून घेतलेले कर्ज गेली चार वर्षापासून थकलेले आहे. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने सतत तगादा लावला होता. कर्ज भरण्यासाठी पैसे उपलब्ध होत नसल्यामुळे सतीश शिंदे यांनी शिंदेवाडी येथील राहत्या घरासमोरील चिंचेच्या झाडाला गळफास लावून बुधवारी पहाटे आत्महत्या केली. शिंदेवाडी या गावात दोन वर्षात कर्जाला कंटाळून ही दुसरी आत्महत्या आहे. सतिश शिंदे यांच्या आत्महत्येच्या घटने नंतर इंदापुरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेतली आहे.