बारावीच्या पेपरपूर्वीच विद्यार्थ्याची आत्महत्या

Last Updated: Feb 19 2020 2:01AM
Responsive image


भीमाशंकर : शिनोली येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहातील बारावीचा विद्यार्थी नितीन सुभाष भोते याने पहिल्या पेपरपूर्वीच वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वसतिगृहात पहिल्या मजल्यावरील खोली नं. 19 मध्ये सोमवारी (दि. 17) रात्री 10.30 ते मंगळवारी (दि. 18) सकाळी 7.30 चे दरम्यान 18 वर्षीय नितीनने सिंलिंग फॅनच्या लोखंडी हुकाला रबरी इलेक्ट्रिक केबल वायरने गळफास घेतला. चिखली हे त्याचे मूळ गाव आहे.