Tue, Nov 20, 2018 02:00होमपेज › Pune › पुणे : व्‍यसनी पतीमुळे पत्‍नीची पेटवून घेऊन आत्‍महत्‍या

पुणे : व्‍यसनी पतीमुळे पत्‍नीची पेटवून घेऊन आत्‍महत्‍या

Published On: Jun 15 2018 4:00PM | Last Updated: Jun 15 2018 3:59PMवाकड : वार्ताहर 

व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये विवाहितेचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवार (दि.१४) रात्री अकरा वाजता म्हाळुंगे येथे घडली. पती विरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पूजा लहू तावरे (३२, रा. म्हाळुंगे, मुळशी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुमीत लक्ष्मण जगताप (२८, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून लहू एकनाथ तावरे या व्यसनी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लहू तावरे याला दारूचे व जुगार खेळण्याचे व्यसन आहे. लहू दारूच्या नशेत पत्नी पुजाला मारहाण करीत होता. तसेच माहेराहून पैसे आणण्यासाठी त्याने तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून  पूजाने राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.