Tue, Apr 23, 2019 13:33होमपेज › Pune › ‘फार्मासिस्ट’ची गोळी झाडून आत्महत्या

‘फार्मासिस्ट’ची गोळी झाडून आत्महत्या

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 07 2018 1:50AMपुणे : प्रतिनिधी

मेडिकलच्या दोन दुकानात  आर्थिक नुकसान झाल्याच्या नैराश्यातून फार्मासिस्ट व्यावसायिकाने राहत्या घरात स्वतःवर पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आला आहे. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या कोरेगाव पार्क परिसरात रविवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली आहे.विशाल विजयसिह लावंड (वय 40, रा. कोरेगाव पार्क) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हे फार्मासिस्ट होते. ते साऊथ मेन रोड येथील लेन जीमध्ये अर्चना मेडोज या इमारतीत 306 फ्लॅटमध्ये राहत.  त्यांची कोरेगाव पार्क व अन्य  एका ठिकाणी मेडिकलचे दुकान होते.  या दोन्ही दुकानात मोठा तोटा झाला होता. त्यामुळे त्यांना दोन्ही दुकाने बंद करावी लागली. यामुळे ते नैराश्यात होते. सध्या ते काही करत नव्हते. ते घरीच असायचे. दरम्यान रविवारी रात्री राहत्या घरी त्यांनी पिस्तूलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घरातील पालकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. कोरेगाव पार्क पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी प्राथमिक तपासात विशाल लावंड यांनी व्यावसायात नुकसान झाल्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. दरम्यान त्यांनी गोळी झाडलेले पिस्तुल परवाना धारक असून, ते विशाल याच्याच नावावर असल्याचे  पोलिसांकडून सांगण्यात आले. अधिक तपास कोरेगाव पार्क पोलिस करत आहेत.

आईला जेवायला मागितले अन् गोळी झाडून घेतली

विशाल, त्यांची आई, वडील व पत्नी घरी होते. विशालने आईला जेवायला मागितले आणि हॉलमधील सोप्यावर बसला. त्यावेळी वडील बाथरूमला गेले. तर, पत्नीही कामात होती. आई ताट आणण्यासाठी किचनमध्ये जाताच विशालने पिस्तूलातून कानाच्यावर गोळी झाडून घेतली. मोठा आवाज आल्याने आई, पत्नी व वडील हॉलमध्ये धावत आले. त्यावेळी विशाल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यांनी पोलिसांना माहिती दिली.