Wed, Nov 14, 2018 20:53होमपेज › Pune › नोकरीवर घेण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

नोकरीवर घेण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 1:46AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी  

कंपनीमध्ये कामावर घेतले नाही तर बरेवाईट करण्याची धमकी देत एकाने कंपनीत येऊन रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार कल्याणीनगर येथील हेगर इलेक्ट्रो प्रा. लि. येथे शुक्रवारी दुपारी घडला. प्रकाश दत्तात्रय भंडारे (32, लोणीकंद) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याचे नाव आहे. तर अमोल पुजारी (37, विमाननगर) यांनी याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश भंडारे हा लोणीकंद जवळील वडू बुद्रूक येथील राहणारा आहे. त्याला हेगर इलेक्ट्रो कंपनीत कामावर घ्यावे अन्यथा आपण जिवाचे काहीतरी बरेवाईट करू अशी धमकी देत तो हातात रॉकेलची कॅन घेऊन शुक्रवारी दुपारी कंपनीत आला. त्यानंतर तेथे येऊन त्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. पुढील तपास येरवडा पोलिस करत आहेत.