Tue, Jun 18, 2019 20:18होमपेज › Pune › न्यायालयात पक्षकाराचा आत्महत्येचा प्रयत्न

न्यायालयात पक्षकाराचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Mar 07 2018 2:11AM | Last Updated: Mar 07 2018 2:06AMपिंपरी : प्रतिनिधी

न्यायालयात खटला चालू असताना न्यायाधीशांनी दर शनिवारी मुलीस भेटण्यास परवानगी दिली असताना देखील पत्नी मुलांना भेटू देत नसल्याने वैतागलेल्या तरुणाने पिंपरी न्यायालयाच्या आवारात रॉकेल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. वकील आणि नागरिकांनी तत्काळ त्याला अडवल्याने पुढील प्रकार टळला. पिंपरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

अरविंद बबन कसबे (29, रा. ओटास्किम, निगडी) असे अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद आणि त्याच्या पत्नीचा कौटुंबिक वाद आहे. 

या वादातून पिंपरी येथील मोरवाडी कौटुंबिक न्यायालयात दावा सुुरू आहे. दरम्यान, न्यायाधीशांनी दर शनिवारी मुलीला भेटू देण्याचे आदेश दिले आहेत, तरी देखील अरविंद याची पत्नी मुलीना भेटू देत नाही. यामुळे अरविंद याने वैतागून न्यायालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आवारातील वकील आणि इतर पक्षकारांनी त्याला अडवले. त्याच्याकडील माचिस बॉक्स काढून घेतला. न्यायालयात इतर आरोपी घेऊन आलेल्या पोलिसांच्या ताब्यात त्याला दिले.