Tue, Apr 23, 2019 19:34होमपेज › Pune › लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 12:31AMपुणे : प्रतिनिधी 

चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने लॉकअपमध्ये असलेल्या अंगावर घेण्याच्या चादरीची किनार कापून तिच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लष्कर पोलिस ठाण्यात रविवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडला. जिलाणी मोहम्मद रफिक दामटी (23, लक्ष्मीनगर फेज नं 11 येरवडा) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याचे नाव आहे. 

याप्रकऱणी पोलिस हवालदार किसन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसारत्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दामटी याला लष्कर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या  चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याला पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.

त्यावेळी त्याने लॉकअपमधील अंगावर घेण्यासाठी ठेवलेली चादरीची किनार फाडून घेतली. त्या साहाय्याने लॉकअपमध्येच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमित घुले करत आहेत.