Tue, May 21, 2019 12:28होमपेज › Pune › अण्णासाहेब मगर जलतरण तलावात पाण्याखालील योगासनांची प्रात्यक्षिके

अण्णासाहेब मगर जलतरण तलावात पाण्याखालील योगासनांची प्रात्यक्षिके

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 16 2018 12:23AMपिंपरी : प्रतिनिधी

नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर जलतरण तलाव येथे महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन व एस.एस.एस. एंटरप्रायजेसच्या वतीने जलतरण प्रशिक्षणाच्या समारोपासाठी शनिवार, दि. 16 ला सायंकाळी 6 वाजता अ‍ॅड. सुधीर ससाणे यांची पाण्याखालील योगासनांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत.

या वेळी पॅरा ऑलिंपिक विजेते छत्रपती पुस्कारप्राप्त पद्मश्री मुरलीकांत पेटकर, आ. महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, सचिव कुंदन लांडगे, स्वीकृत सदस्य विजय लांडे, नगरसेवक तुषार हिंगे, कामगार नेते सचिन लांडगे आदी उपस्थित राहणार आहेत; तसेच 17 मे ते 17 जून या कालावधीत नव्यानेच पोहणे कला आत्मसात करणार्‍या प्रशिक्षणार्थी महिला, पुरुष, मुले-मुली अशा एकूण 120 जणांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी पाण्याखालील योगासनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिबिर आयोजक जलतरण प्रशिक्षक सुनील ननवरे यांनी केले आहे.