पुणे : प्रतिनिधी
राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांची तिरुपती बालाजी देवस्थानच्या विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे. तिरुपती बोर्डाच्या विश्वस्त पदाचा अंतिम निर्णय आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे राखीव असतो. सपना यांना विश्वस्त बनविण्याचा निर्णय मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सपना मुनगंटीवर समाजकार्यात सक्रिय असतात. त्या बालाजीच्या निस्सीम भक्त असून, त्या नियमितपणे दर्शनासाठी तिरूपती येथे जात असतात. अशावेळी सपना यांची विश्वस्त म्हणून झालेली निवड म्हणजे देवाने दिलेला प्रसाद असल्याचे मुनगंटीवार कुटुंबियांचं म्हणणं आहे.
Tags : Tirupati board trustee, udhir Mungantiwar, wife