Wed, Jul 24, 2019 15:02होमपेज › Pune ›

चिमुरड्याच्या पोटातून ९००  ग्रॅमचा गोळा काढण्यात यश

चिमुरड्याच्या पोटातून ९०० ग्रॅमचा गोळा काढण्यात यश
 

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 1:43AMपिंपरी : गेले काही दिवसांपासून अरमान सय्यद या चिमुरडा आजारी होता.  नंतर पोटात खुप दुखत असल्यामुळे त्याला चिंचवड मधील एका खासगी बालरुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रीया करण्यात येउऩ त्याच्या पोटातून 900 ग्रॅम वजनाचा कर्करोगाचा (कॅन्सर) गोळा यशस्वीपणे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. पाच तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर या मुलाला जीवनदान मिळाले आहे. 

अरमान सय्यद या मुलाला पोटात दुखतयं म्हणून चिंचवड येथील एका खासगी बालरुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्याच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. तपासणी अंती त्याच्या पोटात कर्करोगाचा गोळा असल्याचे निष्पन्न झाले.  हा मोठा गोळा पोटात इतरत्र पसरल्याने या चिमुरड्याची उजव्या बाजुची किडनी दाबली गेली होती. एवढेच नाही तर हा गोळा पोटातील महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांना चिकटलेला आढळला. यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अशा वेळी शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

बालरोग शल्य चिकीत्सक डॉ. कल्पेश पाटील यांच्यासह भूलरोग तज्ज्ञ व सहकारी डॉक्टरांच्या मदतीने तब्बल पाच तासांची शस्त्रक्रीया करण्यात आली. पाच तासांच्या अथक प्रयत्नांनतर यशस्वीरित्या हा गोळा बाहेर काढण्यात आला. सुमारे नऊशे ग्रॅम वजनाचा हा गोळा होता. शस्त्रक्रियेनंतर पाच दिवसांच्या उपचार केल्यानंतर अरमानला घरी सोडण्यात आले. लहान मुलांमध्ये अशा प्रकारचा दुर्मिळ स्वरुपाचा आहे. मात्र वेळीच व योग्य उपचार पध्दतीने त्यावर मात करणे शक्य आहे, अशी माहीती डॉ. कल्पेश पाटील यांनी दिली.

Tags : Pimpri, Success,  removing, 900 gram,  children, stomach