Wed, Aug 21, 2019 19:04होमपेज › Pune › नगराध्यक्षपदासाठी तेरा अर्ज दाखल

नगराध्यक्षपदासाठी तेरा अर्ज दाखल

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 10:09PMवडगाव मावळ : वार्ताहर

वडगाव नगरपंचायतीच्या 15 जुलै रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी 13 उमेदवारांनी, तर नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 80 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे, तहसीलदार रणजित देसाई व नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांनी दिली. निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा सोमवारी (दि. 25) अखेरचा दिवस होता. दि. 21 रोजी 

नगराध्यक्षपदासाठी एकच अर्ज दाखल झाला होता, तर दि. 22 रोजी नगराध्यक्षपदासाठी 3 व नगरसेवकपदांसाठी 16 अर्ज दाखल झाले होते. सोमवारी नगराध्यक्ष दासाठी 13 उमेदवारांनी 15 अर्ज दाखल केले असून, नगरसेवकपदासाठी 80 उमेदवारांनी 115 अर्ज दाखल केले असल्याने एकूण 93 उमेदवारांनी 130 अर्ज दाखल केले आहेत. (दि.26) रोजी दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे. 
दरम्यान, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँगे्रस आघाडी, शिवसेना, मनसे अशा विविध पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले असून, उमेदवारी जाहीर न करता थेट तहसील कार्यालयामध्येच अधिकृत उमेदवारांच्या अर्जांना ए.बी.फॉर्म जोडण्यात आले.

नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :

जहीर फैज सोलकर, मयूर प्रकाश ढोरे, देविदास ज्ञानेश्‍वर जाधव, अंबादास भास्कर बवरे, सुभाषराव रघुनाथ जाधव, अबोली मयूर ढोरे, मनोज खंडेराव ढोरे, भास्करराव बाबूराव म्हाळसकर, मोहन उत्तम भेगडे, पंढरीनाथ राजाराम ढोरे, आशुतोष भरत टपाले, सुनील गणेश ढोरे, योगेश कृष्णा म्हाळसकर.

प्रभागनिहाय अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :

प्रभाग : 1 (अनु.जमाती) : दशरथ केंगले, दीपक कोकाटे, मीरा पारधी, अविनाश हिले; प्रभाग 2 : (सर्वसाधारण) : श्रीधर चव्हाण, राजू चव्हाण, बाळू चव्हाण, दिनेश ढोरे, प्रवीण ढोरे, वैभव पिंपळे, दत्तात्रय पिंपळे, महेश घुले, रवींद्र चव्हाण, संदीप चव्हाण, राहुल घुले, योगेश म्हाळसकर, अश्‍विनी म्हाळसकर;  प्रभाग 3 : (नामाप्र स्त्री) : शारदा ढोरे, अश्‍विनी तुमकर;  प्रभाग 4 :  (नामाप्र) : ताहिर मोमीन, राहुल ढोरे, वैशाली शाम ढोरे;  प्रभाग 5 (नामाप्र स्त्री) : पूनम खंडेराव जाधव, रुक्मिणी गराडे, रेखा विलास दंडेल;  प्रभाग 6 : (सर्व.स्त्री) : पूजा विशाल वहिले, अश्‍विनी शेखर वहिले; प्रभाग 7 : (अनु.जाती) : चंद्रजित वाघमारे, मिलिंद ओव्हाळ, अजय भवार, प्रमोद भालेराव; प्रभाग 8 : (नामाप्र स्त्री) : माया अमर चव्हाण, सारिका प्रशांत चव्हाण;  प्रभाग 9 : (सर्वसाधारण) : सुरेश जांभूळकर, अतुल राऊत, अंबादास बवरे, दिलीप पगडे, अमोल पगडे, संभाजी म्हाळसकर, भूषण मुथा, प्रवीण चव्हाण, प्रसाद पिंगळे, महेंद्र म्हाळसकर; प्रभाग 10 : (सर्व. स्त्री) : अर्चना समीर ढोरे, प्रमिला राजेश बाफना, सुरेखा मोतीलाल बाफना;  प्रभाग 11 : (नामाप्र): किरण म्हाळसकर, संतोष निघोजकर, सिध्देश्‍वर झरेकर, सोमनाथ धोंगडे, महेंद्र म्हाळसकर;  प्रभाग 12 : (सर्वसाधारण) : पद्मावती ढोरे, राजेश ढोरे, गणेश म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर;  प्रभाग 13 : (सर्व. स्त्री) : धनश्री शंकर भोंडवे, जया नवनाथ भिलारे, प्रतिभा नारायण ढोरे, सुनीता खंडू भिलारे, पौर्णिमा गणेश भांगरे, माया रामदास भेगडे, सारिका प्रताप ढोरे; प्रभाग 14 : (अनु.जाती स्त्री) : दीपाली शरद मोरे, वैशाली गौतम सोनवणे, आम्रपाली नितीन मोरे, रेश्मा भरत मोरे, मंदा गोरख पोते;  प्रभाग 15 : (सर्वसाधारण) : राजेंद्र कुडे, संतोष चव्हाण, नितीन कुडे, दीपक कुडे, अनंता कुडे, प्रभाग 16 : (सर्व.स्त्री) : सुरेखा हनुमंत म्हाळसकर, सायली सुनील शिंदे, मीनाक्षी गणेश ढोरे;  प्रभाग 17 (सर्व.स्त्री) : अबोली मयूर ढोरे, अर्चना संतोष म्हाळसकर, सुवर्णा रामदास म्हाळसकर.