Tue, Sep 25, 2018 11:19होमपेज › Pune › विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीवरील विघ्न टळले

विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीवरील विघ्न टळले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या पहिली ते नववीच्या शाळा 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश सोमवारी विद्या प्राधिकरणाच्या परिपत्रकानुसार देण्यात आले होते. परंतु, हे आदेश घाईघाईने देण्यात आल्याचे सांगत, हा आदेश मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली आहे. त्यामुळे यंदा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीवरील विघ्न टळले आहे. 

पहिली ते नववीच्या शाळांच्या संकलित मूल्यमापनाच्या चाचणीची प्रक्रिया संपल्यानंतर निकाल लागेपर्यंत शालेय उपक्रमांचे आयोजन होत नसल्यामुळे, विद्यार्थी  शाळेत उपस्थित राहत नसल्याचे कारण देत, प्राधिकरणाने  शाळेत संकलित चाचणीनंतर उन्हाळी सुट्टी सुरू होईपर्यंतच्या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते.


  •