Tue, Jul 23, 2019 04:57होमपेज › Pune › 'एफटीआयआय'च्या प्रशासना विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

'एफटीआयआय'च्या प्रशासना विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Published On: Aug 23 2018 11:50PM | Last Updated: Aug 23 2018 11:49PMपुणे : प्रतिनिधी

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या प्रशासनाविरोधात सिनेमॅटोग्राफीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. संस्थेच्या गलथान व्यवस्थापनामुळे आम्हा विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून यावर तोडगा काढल्याशिवाय वर्गाला हजर न राहण्याचा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

२०१८-१९ या सत्राचा संपूर्ण अभ्यासक्रम मिळावा, अद्ययावत साहित्यासह वर्ग खोली उपलब्ध व्हावी, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे दिवस आणि रात्र अशा दोन सत्रात वर्ग ठेवण्यात आली असून दोनही सत्राला समान सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशा विविध मागण्या या विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत. याबाबत मेलद्वारे आणि प्रत्यक्ष बैठकीमधून संस्थेचे संचालक भुपेंद्र कैन्थोला यांच्याशी विद्यार्थ्यांनी चर्चा केली आहे. मात्र, समाधानकारक आणि लेखी उत्तर न मिळाल्याने हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच ठेवण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.