Tue, Nov 20, 2018 03:42होमपेज › Pune › अंतराचा घोळ ; विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

अंतराचा घोळ ; विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 27 2018 11:53PMपिंपरी : वर्षा कांबळे

आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जामध्ये शाळांची निवड करताना तीन किलोमीटरच्या आतील शाळा निवडणे बंधनकारक आहे. मात्र, गुगल मॅपवरील अंतरामध्ये लॅटीट्युड आणि लॉगिंट्युडचा पाँईट चुकीचा दिल्यामुळे अ‍ॅॅड्रेसचे लोकेशन मॅच होत नसल्याचे कारण दाखवून शाळा प्रवेश नाकारत आहेत. त्यामुळे बरचेसे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. 

प्रवेश अर्ज भरताना बर्‍याचशा पालकांना चुकीचे अंतर दाखविल्यामुळे घरापासून लांब पल्ल्याच्या शाळेत प्रवेश मिळाला आहे. शासनाच्या जीआरमध्येही प्रवेश घेणार्‍या विद्याथ्यार्ंचे शाळेपासूनचे घरापर्यंतचे अंतर गुगल मॅपने निश्‍चित केले असल्याने भौगोलिक परिस्थितीनुसार तफावत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी काळजीपूर्वक निवड करणे गरजेचे आहे. मात्र,  बर्‍याचशा पालकांना इंटरनेटचे ज्ञान नसल्यामुळे पालकांकडून चुका झाल्या आहेत. 

पत्ता देताना लॅटीट्युड आणि लॉगिंट्युडचा पाँईट थोडा इकडे तिकडे होतो. व्हेरिफिकेशनमध्ये काही चुका असतील तर तो ठरविण्याचा अधिकारी शासनाला असताना देखील शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत. काहीवेळेस अ‍ॅड्रेस बरोबर असतो व्हेरिफिकेशन सिलेक्ट केललेे लोकेशन मॅच होत नाही म्हणून ते चुकीचे आहे असे ठरवून शाळा प्रवेश रद्द करत आहेत. घराच्या जवळची खूण दिली तर लोकेशन चुकले असे शाळा सांगतात. 

यंदा एकच पसंतीक्रम असल्यामुळे फक्त अंतराच्या घोळामुळे प्रवेश झाला नाही तर पाल्यास प्रवेश प्रक्रियेबाहेर पडावे लागणार या भितीने पालकांना ग्रासले आहेत. तसेच, ज्या पालकांनी शिक्षणमंडळामार्फत शाळांविषयी तक्रार केली त्या पालकांची व पाल्याची हेटाळणी केली जाते. महापालिकेने शाळांना नोटीसा पाठविल्यामुळे तुम्ही तक्रार केल्या आहेत जेव्हा निर्णय होईल तेव्हा बघू असे म्हणून असा दम पालकांना भरला जात आहे.