Thu, Feb 21, 2019 11:30होमपेज › Pune › पुणे : बारावीत नापास झाल्याच्या नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे : बारावीत नापास झाल्याच्या नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

Published On: May 31 2018 3:00PM | Last Updated: May 31 2018 3:00PMयवत : वार्ताहार

बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातुन विद्यार्थाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास समोर आली आहे. ही घटना दौंड तालुक्यातील डाळींब येथे घडली आहे. प्रकाश सोपान म्हस्के ( वय १८ वर्षे रा.डाळींब, ता. दौंड, जि. पुणे) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रकाश हा (उरुळी कांचन, ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण घेत होता. त्याने बारावीची परीक्षा दिली होती. बुधवारी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला होता त्यात प्रकाश नापास झाला. नापास झाल्याच्या नैराश्यातुन प्रकाशने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रकाश यास पुढील उपचारासाठी उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी प्रकाश यास मृत घोषित केले. प्रकाशचे वडील सोपान गेनबा म्हस्के यांनी यवत पोलिसांना घटनेची माहिती दिली असून यवत पोलिसांनी आकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. प्रकाशच्या आत्महत्येच्या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार नंदकुमार लोणकर करीत आहेत.