Thu, Apr 25, 2019 11:31होमपेज › Pune › अकरा हजाराची लाच घेताना एसीबीने सहायक अभियंत्याला रंगेहात पकडले

अकरा हजाराची लाच घेताना एसीबीने सहायक अभियंत्याला रंगेहात पकडले

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 12:27AMपुणे : प्रतिनिधी

महावितरणचे मिटर बसविणार्‍या कॉन्ट्रेक्टरकडून अकरा हजार रुपयांची लाच स्विकारताना आंबेगाव शाखेतील सहायक अभियंत्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. शुक्रवारी आंबेगाव शाखेच लाच घेताना दुपारी पकडण्यात आले. स्वप्नील अशोक जाधव (वय 28) असे लाच स्विकारताना पकडण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यातील तक्रारदार हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे ठेकेदार आहेत. त्यांना श्रीनाथ कंन्स्ट्रक्शन यांनी 11 विद्यूत मीटर बसविण्याचे काम कॉन्ट्रेक्ट दिले होते. त्यावरून तक्रारदार यांनी दत्त्तनगरमधील आंबेगाव शाखेत याबाबत कागदपत्र सादर केली होती. त्यावेळी शाखेतील सहायक अभियंता स्वप्नील जाधव यांने तक्रारदार यांना त्यांनी दिलेल्या कागदपत्राचे एस्टिमेट बनवून त्यामध्ये सहकार्य करण्यासाठी प्रत्येक मीटरमागे एक हजार याप्रमाणे अकरा मीटरचे 11 हजार रूपये लाच मागितली.

याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार नोेंदवली होती. एसीबीकडून तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी कार्यालयातच जाधव यांना तक्रारदार यांच्याकडून 11 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. कोणत्याही शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या 020-26122134, 26132802 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले.