Sat, Feb 16, 2019 10:44होमपेज › Pune › थांबलेल्या ट्रकला मोटारीची धडक : 4 ठार

थांबलेल्या ट्रकला मोटारीची धडक : 4 ठार

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 12:56AMखेड शिवापूर : वार्ताहर

पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर  टोल नाक्याजवळील हॉटेलसमोर थांबलेल्या ट्रकला (एमएच 14 डीएम 6355) मागून चारचाकी मोटारीने (एमएच 12 एफझेड 0289) जोरदार  धडक दिली. या अपघातात मोटारमधील चार जण जागीच ठार झाले. त्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. अश्विनी आसवले, उज्ज्वला सणस, अरुणा भोसले (तिघेही रा. पुणे) व चालक ओंकार पोळ (25, रा. शिंदेवाडी, ता. भोर) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी (दि. 25) दुपारी चार वाजता हा अपघात झाला. त्यामध्ये चार जणांना आपला जीव गमवावा लागला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे-सातारा रस्त्यावर खेड शिवापूर येथे टोलनाका आहे. या टोलनाक्यानंतर 400 मीटर अंतरावर सेवा रस्ता संपलेला आहे. तेथे चारचाकी वाहनांना त्या ठिकाणी गेल्यावर रस्ता संपल्याचे लक्षात येते. 

दरम्यान, या ठिकाणी एका हॉटेलपुढे ट्रक उभा होता. ट्रकमधील चालक व क्लीनर हॉटेलमध्ये जेवणाकरीता गेले होते. यावेळी भरधाव वेगात पुण्याकडून सातार्‍याकडे जाणारी कार या ट्रकवर पाठीमागून धडकली. त्यामध्ये गाडीतील चौघांचाही मृत्यू झाला.दरम्यान, सेवा रस्ता संपला त्याठिकाणी चालक वेगात असल्यामुळे त्याला गाडीवर ताबा मिळवणे अशक्य होते. परिणामी अपघात होतात. यामुळे या रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे-सातारा महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा झाला असून अनेक नागरिकांचे या मार्गावर  बळी गेले आहेत.