होमपेज › Pune › शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल सुरू; असा भरा फॉर्म

शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल सुरू; असा भरा फॉर्म

Published On: Jul 07 2018 1:37AM | Last Updated: Jul 07 2018 11:10AMसांगली : प्रतिनिधी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळेत शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया ‘पवित्र’ पोर्टलवरून राबविण्यात येणार आहे. हे पोर्टल शुक्रवारी सुरू झाले. अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची नोंदणी पवित्र पोर्टलवर सुरू झालीआहे.  शिक्षण सेवक भरतीची कार्यवाही ई-गव्हर्नन्स सेलद्वारे राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे होणार आहे. ‘पवित्र’चे कामकाज सुरू झाले आहे.   

शिक्षक पदासाठी अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांवरून भरती होणार आहे. त्याअनुषंगाने अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची नोंदणी पवित्र पोर्टलवर सुरू झाली आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही निश्‍चित केलेले आहे. अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे आसन क्रमांक आणि त्यांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याचा दिनांक निश्‍चित केलेला आहे. दि 6 जुलै ते 23 ऑगस्ट 2018 या कालावधीत ही नोंदणी होणार आहे. 

👉पवित्र पोर्टलवर जाण्यासाठी येथे क्‍लिक करा...

👉पवित्र पोर्टलवर माहिती कशी भरावी हे वाचण्यासाठी क्‍लिक करा...

उमेदवारांना पवित्र नोंदणीसाठीचे वेळापत्रक 

दि. 6 ते 8 जुलै : एसईडी टीएआयटी 0000001 ते 0005000
दि. 9 ते 11 जुलै : एसईडी टीएआयटी 0005001 ते 0015000
दि. 12 ते 15 जुलै : एसईडी टीएआयटी 0015001 ते 0030000
दि. 16 ते 18 जुलै : एसईडी टीएआयटी 0030001 ते 0045000
दि. 19 ते 22 जुलै : एसईडी टीएआयटी 0045001 ते 0060000
दि. 23 ते 25 जुलै: एसईडी टीएआयटी 0060001 ते 0075000
दि. 26 ते 29 जुलै : एसईडी टीएआयटी 0075001 ते 0090000
दि. 30 जुलै ते 1/8 : एसईडी टीएआयटी 0090001 ते 0105000
दि. 2 ते 5 ऑगस्ट : एसईडी टीएआयटी 0105001 ते 0120000
दि. 2 ते 5 ऑगस्ट : एसईडी टीएआयटी 0120001 ते 0135000
दि. 9 ते 12 ऑगस्ट : एसईडी टीएआयटी 012001 ते 0150000
दि. 13 ते 15 ऑगस्ट :एसईडी टीएआयटी 0150001 ते 0165000
दि. 16 ते 19 ऑगस्ट: एसईडी टीएआयटी 0165001 ते 0180000
दि.20 ते 23 ऑगस्ट : एसईडी टीएआयटी 0180001 ते 0199143