Mon, May 27, 2019 09:41होमपेज › Pune › कृषी योजनांच्या अनुदानाचा निधी मार्चपूर्वी खर्च करा

कृषी योजनांच्या अनुदानाचा निधी मार्चपूर्वी खर्च करा

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 21 2018 12:28AMपुणे ः प्रतिनिधी

राज्यातील शेतकर्‍यांसाठी कृषि विभागाच्या विविध योजनांच्या अनुदानाचा निधी मार्च महिन्याअखेर खर्च करण्यासाठी अधिकार्‍यांना लक्ष दयावे. त्यानुसार योजनानिहाय नियोजन करुन शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदान वेळेत जमा करण्याच्या सूचना कृषि व पणन विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार यांनी शनिवारी येथे दिल्या.

साखर आयुक्तालयातील आत्मा सभागृहात दुपारी त्यांच्या अध्यक्षतेखाली विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, फलोत्पादन व राष्ट्रीय फलोद्यान अभियानाचे संचालक प्र. ना. पोकळे, विस्तार, प्रशिक्षण व नियोजन, कृषि प्रक्रिया संचालक विजयकुमार घावटे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा तथा आत्माचे संचालक सुभाष खेमनर, निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण संचालक मच्छिंद्र घोलप आदींसह अन्य कृषि अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

आर्थिक वर्ष 2017-18 मधील योजनांनिहाय अनुदानाच्या खर्चाचा आढावा घेताना ते पुढे म्हणाले की, योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी अधिकार्‍यांनी अधिक लक्ष द्यावे. बियाणे समितीच्या बैठकीत त्यांनी खरीप आणि रब्बी हंगामाचा आढावा घेतला. पुढील वर्षाच्या म्हणजे हंगाम 2018-19 मध्ये बियाणांची उपलब्धता करण्याच्या नियोजनास आत्तापासूनच सुरुवात करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली.