होमपेज › Pune › पुणे-हजरत निजामुद्दीन दरम्यान विशेष रेल्वे

पुणे-हजरत निजामुद्दीन दरम्यान विशेष रेल्वे

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 12:25AMपुणे : प्रतिनिधी 

सुटीचा हंगाम व प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे ते हजरत निजामुद्दीनदरम्यान एक विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 02099 सुपरफास्ट विशेष रेल्वे मंगळवारी (दि. 29) मध्यरात्री 12 वाजून 25 मिनिटांनी पुणे स्थानकातून सुटून हजरत निजामुद्दीन येथे दुसर्‍या दिवशी मध्यरात्री 2 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला चिंचवड, लोणावळा, पनवेल, वसई रोड, सुरत, वडोदरा, गोध्रा, रत्लाम, कोटा, मथुरा येथे थांबा देण्यात आला आहे. 

एक वातानुकूलित 2 टियर, एक वातानुकूलित 3 टियर, 9 शयनयान कोच, 2 सेकंड क्‍लास व 7 जनरल सेकंड क्‍लास कोच या गाडीला जोडण्यात येणार आहेत. या गाडीसाठी विशेष शुल्क आकारण्यात येणार असून त्याचे आरक्षण रविवारपासून (दि. 27) सुरू करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. प्रवासी आयआरसीटीसी डॉट को डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आरक्षण करू शकतात, तसेच आरक्षण केंद्रांवरही तिकीट काढू शकतात, अशी माहिती देण्यात आली. अधिकाधिक प्रवाशांनी या सेवेचे लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.