Wed, Nov 21, 2018 17:30होमपेज › Pune › नेत्याची ओळख सांगून ७२ लाखांना फसवले 

नेत्याची ओळख सांगून ७२ लाखांना फसवले 

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 07 2018 11:07PMवाकड : प्रतिनिधी

एका मोठ्या नेत्याशी माझी ओळख आहे, मी तुम्हाला बांधकाम विभागाचे टेंडर मिळवून देतो, त्यासाठी गुंतवणुकीसाठी  पैसे जमा करावे लागतील, असे आमिष दाखवून एकाची 72 लाखांची फसवणूक झाली. हा प्रकार बुधवारी रात्री  उघडकीस आला आहे.  या प्रकरणी संजय सुर्वे (वय 45, रा. पिंपळे गुरव) यांनी भोसरी पोलिसांत फिर्याद दिली.

त्यानुसार विनायक नरेंद्र सुर्वे (वय 30, रा. ठाणे) याच्याविरोधात  गुन्हा दाखल केला आहे. संजय हे व्यावसायिक आहेत. विनायकने टेंडर मिळवून देतो, असे सांगून  संजयकडून 72 लाख 25 हजार रुपये बँक खात्यावर ट्रान्स्फर करून घेतले. पैसे देऊनही टेंडर मिळाले नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संजय यांनी पोलीसात धाव घेतली.