Tue, Jul 23, 2019 10:28होमपेज › Pune › कचराडेपोग्रस्तांची आश्‍वासनावर बोळवण

कचराडेपोग्रस्तांची आश्‍वासनावर बोळवण

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 26 2018 11:14PMफुरसुंगी : वार्ताहर

उरुळी देवाची-फुरसुंगी येथील कचराडेपो बंद होऊन सुमारे 7 वर्ष उलटले असले तरी अद्यापही या कचराडेपो बाधित येथील दोन्ही गावच्या रहिवाश्यांच्या समस्येचे भिजत घोंगडे कायम असल्यांने हे रहिवाशी हवालदिल झाले आहेत.गेली अडीच दशके कचराडेपोरुपी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असलेल्या उरुळी देवाची-फुरसुंगी या दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या सहनशक्तीचा अंत झाल्यानंतर त्यांनी कायदेशीर मार्गे, तीव्र आंदोलनाद्वारे येथील कचराडेपो पुर्णपणे बंद करण्याचा वारंवार मागणी केली, परंतू पुणे महानगरपालिका प्रशासनाने त्याला वारंवार वाटाण्याच्या अक्षता लावल्या, शेवटी न राहवून येथील ग्रामस्थांना कचराडेपोच्या गाड्या अडविल्यानंतर पालिकेने ग्रामस्थांना विविध विकासकामांचे गाजर दाखवित याठिकाणचे ओपन डंपिग 31 मे 2010 रोजी बंद केले. मात्र आजमितीसही समस्या जैसे थे तैसेच आहे. 

पाण्याचा गंभीर प्रश्‍न

या कचराडेपोमुळे परिसरातील पाण्याचे सर्व स्त्रोत दुषित झाल्याने याठिकाणी पालिकेने काही वर्षापुर्वी याठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर सुरु केले खरे परंतू टँकर वेळेत न येणे, काही भागात चार-चार दिवसांनी टँकर येणे, टँकरचे पाणी मिळविण्यासाठी करावे लागणारे दिव्य यांमुळे येथील जनता टँकरच्या द‍ृष्टचक्रात सापडली आहे. अद्यापही 73 कोटीची पाणीयोजना पूर्ण होण्यांस काही कालावधी लागणांर असल्यांने तोपर्यंत येथील रहिवाश्यांचे टँकरच्या चक्रव्यृहात अडकले आहेत.

कॅपिंगचे रेंगाळलेले काम

कचराडेपोशी संदर्भात दुसरा महत्वाचा प्रश्‍न म्हणजे कचराडेपोवर करण्यात येणारे कॅपिंग. कॅपिंगच्या कामांस सुरुवांत होऊन चार-पाच वर्ष झाले असले तरी अद्यापही येथील कचर्‍याच्या डोंगरावर कॅपिंगचे करण्याचे काम पूर्ण झालेले नाही. याठिकाणी कार्यान्वित असलेल्या हंजर प्रकल्पांच्या आडून परिसरांत गुपचूपणेपणे मोठ्या प्रमाणांत कचरा ओपन डंम्पिंग होत असल्यांने येथील ग्रामस्थांनी हंजरचे काम थांबविले. मात्र दोन वर्षापुर्वी झालेल्या आंदोलनानंतर हा सर्व कचरा पुन्हा कॅपिंगमध्ये घ्यावा लागला तसेच त्यानंतर गेल्या अडीच वर्षापासून रोज सुमारे 500 मे.टनापेक्षा अधिक कचरा शहरातून कॅपिंगच्या नावाखाली आणून टाकला जात आहे. त्यांमुळे येथील कॅपिंग क्षमता व कामाची मुदत संपून गेली असली तरी  बळजबरी याठिकाणी कचरा कॅपिंगमध्ये घेण्याचे काम सुरु आहे. 

वारंवार लागणांर्‍या आगी

कॅपिंगचे काम पूर्ण न झाल्याने कचर्‍याच्या भल्यामोठ्या डोंगराच्या स्वरूपात कचरा येथे उघड्यावर पडून आहे, त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात या कचर्‍याच्या ढिगांना आगी लागून येथील रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. आग विझविण्याच्या प्रभावी उपाययोजनाही पालिकेकडे नसल्याने या आगी आठ-आठ दिवस सुरु राहत आहेत. ओपन डंम्पिग कचरा जिरविण्यासाठीच याठिकाणी जाणूनबूजून आगी लावल्या जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

पावसाळ्यात दुर्गंधीचे साम्राज्य

कॅपिंगच्या नावाखाली शहरातून टाकण्यांत येणांरा याठिकाणच्या कचर्‍याच्या डोंगरामुळे पावसाळ्यात येथील दुर्गंधी व कचराडेपोमुळे पैदा झालेल्या घरमाश्या व डास येथील रहिवाश्यांचे जीणे मुश्किल करीत आहे. पावसाळ्यांत कचराडेपोमधून निघणारे लिचेट ओढ्यात मिसळून येथील ओढ्यांना गटारांचे स्वरुप प्राप्त होत आहे. 

प्रकल्पगस्तांचा चेंडू अद्यापही शासन कोर्टात

कचराडेपोसाठी जागा दिलेल्या शेतकर्‍यांना अथवा त्यांच्या वारसांना पालिकेत नोकरी देण्याबाबत येथील दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली. आंदोलन मागे घ्यावे यासाठी पालिकेच्या वतीने आश्‍वासन देऊन येथील 65 लोकांची यादी राज्यसरकारला पाठविण्यांत आली आहे मात्र या सर्वांना घेणे शक्य नसल्याचे राज्यसरकारने सांगितल्यांंमुळे हा विषय अधांतरी लटकला आहे.

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

कॅपिंगअभावी सर्व ओला-सुका कचरा उघड्यावरच असल्याने या कचर्‍यावर, याठिकाणी टाकण्यात आलेल्या मृत जनावरांवर येथील अनेक भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या पोसत असून त्या आता येथील ग्रामस्थांच्या पशुधनाबरोबरच येथील रहिवाश्यांवरही खुलेआम हल्ले करु लागल्या आहेत. मात्र या भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यांस पालिका प्रशासन असमर्थ ठरल्याने या कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

पालिकेतील समावेश म्हणजे आगीतून फुफाट्यात 

पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर कचराडेपो कायमस्वरुपी बंद होऊन उरुळी -फुरसुंगीचा सुनियोजित पद्दधतीने विकास होईल ही भाबडी आशा लावून बसलेल्या ग्रामस्थांचा भ्रमनिराश झाला असून वाढलेला कर, रखडलेली विकासकामे, सुरु असलेले ओपन डंम्पिग, ठप्प प्रशासन यांमुळे ग्रामस्थांवर पालिकेपेक्षा गाव बरा होता अशी म्हणण्याची वेळ आली आहे.