Wed, Jul 17, 2019 08:26होमपेज › Pune › सदर्न कमांडचे १२५ व्या वर्षांत पदार्पण

सदर्न कमांडचे १२५ व्या वर्षांत पदार्पण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

भारतीय लष्कराचे सर्वात जुने दल व सर्वात मोठे मुख्यालय अशी ख्याती मिरवणार्‍या सदर्न कमांडला रविवारी (दि. 1) 124 वर्षे पूर्ण झाली असून, 125 व्या वर्षात दिमाखात पदार्पण केले. सदर्न कमांडच्या स्थापनादिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सदर्न कमांडच्या प्रमुखपदाची धुरा सांभाळणारे कमांडर इन चीफ लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

सोनी म्हणाले, सदर्न कमांडच्या अखत्यारित समुद्र, पठारी प्रदेश व वाळवंट असा भूभाग आहे. यामुळे या सर्व प्रकारच्या युद्ध कौशल्यांसाठी आवश्यक प्रशिक्षण, तंत्रज्ञानासह सदर्न कमांड सज्ज आहे. नव्या पिढीला प्रशिक्षण देऊन तयार करणे हे लष्करासमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. दरम्यान, भारतीय सैन्याचे युद्ध कौशल्य उपस्थितांनी अनुभवले. सैन्याच्या ताफ्यातील अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व दारुगोळा यांची सुसज्जता या निमित्ताने नागरिकांना अनुभवायला मिळाली. रणगाड्यांच्या हालचाली, पॅराट्रूपर्स यांच्या कामगिरीचा थरार पुणेकरांना याची देही याची डोळा अनुभवता आला. बंगळुरूमधील सीएमपी सेंटरमधील जवानांनी मोटारसायकलींच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. यामुळे उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः काटे आले. 

दोन जवान जखमी

प्रात्यक्षिकांच्या दरम्यान वापरण्यात आलेल्या जिप्सी या वाहनाचा अपघात होऊन दोन जवान किरकोळ जखमी झाले. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. एका जवानाला पायाची तर दुसर्‍या जवानाला पाठीला दुखापत झाली. जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची इजा फारशी गंभीर नाही, अशी माहिती देण्यात आली.

 

Tags : pune, pune news, Southern Command, 125th year,


  •