Wed, Aug 21, 2019 14:47होमपेज › Pune › आदिवासी बांधवांच्या आनंदातच समाधान

आदिवासी बांधवांच्या आनंदातच समाधान

Published On: Jul 13 2018 1:14AM | Last Updated: Jul 13 2018 1:13AMपिंपरी : कामातून आदिवासी बांधवांच्या मनात विश्‍वास निर्माण  केला आणि त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करु शकलो, हे समाधान खुप मोठे आहे. यामुळे आज आदीवासी बांधव स्वावलंबी झाले आहेत. ते जेव्हा आत्मविश्‍वासाने पुढील वाटचाल करतील तेव्हाच आपले कार्य पूर्ण झाले असे मला वाटेल असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. 

वाकड विनोदेनगर येथील कै. गजराबाई निवृत्ती विनोदे यांच्या स्मरणार्थ जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे या दाम्पत्याचा मानपत्र देऊन विशेष सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. आमटे बोलत होते. यावेळी माजी खासदार नानासाहेब नवले, हभप शंकर महाराज शेवाळे, संजय महाराज पाचपोर, आदी उपस्थित होते.  डॉ. आमटे म्हणाले, 1973 मध्ये हेमलकसा येथे जेव्हा कामाची सुरुवात झाली तेव्हा येथील आदीवासी समाज भूक, रोगराई आणि अंधश्रध्देच्या विळख्यात अडकले होते. त्यानंतर जसजसे कार्य विस्तारत गेले त्यानुसार आदीवासींचे जीवन पूर्ण बदलत गेले. यासाठी बाबांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले.