होमपेज › Pune › #Women’sDayउपेक्षित महिलांच्या सन्मानासाठी लढणार्‍या मावळकन्या निताताई 

#Women’sDayउपेक्षित महिलांच्या सन्मानासाठी लढणार्‍या मावळकन्या निताताई 

Published On: Mar 08 2018 1:21AM | Last Updated: Mar 08 2018 1:21AMउपेक्षित महिलांच्या सन्मानासाठी लढणार्‍या मावळ कन्या, नगरसेविका निताताई अनंत दांगट पाटील यांनी विविध विकास कामांतून तसेच महिला, विद्यार्थ्यांनी साठी विविध उपक्रम राबवून  सिंहगडरोडवर ,वडगाव धायरी परिसरात आपल्या सामाजिक बांधिलकीचे नाते दृढ केले आहे. 

राजकारणात असूनही सामाजिक चळवळीत सक्रिय सहभागी होऊन मनपा तसेच इतरशाळेतील विद्यार्थ्यांनी ,महाविद्यालयीन तरूणी, घरकाम ,सफाईकाम , भाजी विक्री ,मजूरी करणार्‍या महिला , वृध्द महिलांच्या व्यथा समजावून त्यांच्या हक्कासाठी निताताई दांगट पाटील यांनी वर्षभरात विविध कल्याणकारी योजनां सुरू केल्या आहेत. सासरे कै.चंद्रकांत दांगट पाटील यांनी ज़ोपासलेला सामाजिक बांधिलकीचा वारसा त्यांनी विविध समाजोपयोगी कार्यातून जिवंत केला आहे.

गोर गरीब ,कष्टकरयांची मुले ,मुली बहुसंख्येने शिक्षण घेत असलेल्या  वडगाव बुदरूक येथील मनपा शाळेत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी  त्यांनी पुढाकार घेतला आहे.  महापालिका तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना तळागाळातील कष्टकरी महिलां पर्यंत पोहोचण्यासाठी वचनबद्ध आहे.  त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे..कुटूंबाच्या ,राष्ट्राच्या जडणघडणीत महिलांचे योगदान मोठे आहे.त्यांच्या सन्मानासाठी चळवळ  सुरू असल्याचे निताताई दांगट पाटील यांनी सांगितले.