Sun, Mar 24, 2019 23:21
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › स्मार्ट सिटीचे भांडवल ३०० कोटी

स्मार्ट सिटीचे भांडवल ३०० कोटी

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 1:38AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

स्मार्ट सीटीसाठी नेमण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सीटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) या कंपनीचे भागभांडवल आता 300 कोटींच्या घरात पोहचणार आहे. भांडवल वाढविण्याचा प्रस्ताव कंपनीच्या शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. त्यास मान्यता देण्यात आलेली आहे. 

स्मार्ट सीटी योजनेसाठी केंद्रशासनाकडून पाच वर्षांत प्रत्येकी 100 कोटींप्रमाणे 500 कोटींचे अनुदान येणार आहे. तर, राज्यशासन आणि महापालिकेकडून प्रत्येक वर्षाला 50 कोटींप्रमाणे सुमारे 500 कोटींचे भांडवल दिले जाणार आहे. त्यात केंद्राचा निधी हा अनुदान स्वरूपातील असल्याने त्याच्या खर्चावर कोणतेही बंधन नव्हते. मात्र, महापालिका आणि राज्यशासनाचा निधी हा भांडवलाचा असल्याने त्याच्या खर्चाबाबत स्पष्टता नव्हती.

परिणामी जून 2016 मध्ये पीएससीडीसीएल या एसपीव्हीचे कामकाज सुरू झाल्यानंतर महापालिका आणि राज्यशासनाकडून देण्यात आलेला निधी कंपनीकडून राष्ट्रीयकृत बँकेमध्ये एफडीच्या स्वरुपात गुंतविण्यात आलेला होता. मात्र, या निर्णयामुळे हा निधीही आता स्मार्ट सीटीमधील विकासकामांसाठी वापरण्यास मिळणार आहे. 

कंपनी स्थापन करण्यात आल्यानंतर या कंपनीचे महापालिका आणि राज्यशासन हे भांडवलधारक असल्याने त्यांच्या निधी बाबत स्पष्टता नव्हती. या योजनेसाठी राज्यशासन आणि महापालिकेकडून पुढील 3 वर्षे देण्यात येणारे प्रत्येकी 50 कोटींचे अनुदान हे या पुढे या भांडवलाचा भाग असणार आहे. या कंपनीचे सुरुवातीचे भांडवल अवघे 5 लाख रुपये होते. त्यानंतर गेल्या दीड वर्षात त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे भांडवल वाढविण्याचा प्रस्ताव कंपनीच्या शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. त्यास मान्यता देण्यात आलेली आहे.