Thu, Apr 25, 2019 23:36होमपेज › Pune › विमान कंपन्यांची ‘स्मार्ट’ बॅगांना बंदी

विमान कंपन्यांची ‘स्मार्ट’ बॅगांना बंदी

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 12:50AM

बुकमार्क करा
नवी दिल्ली :

स्मार्ट स्वरूपाच्या बॅगा विमानातून नेण्यास जेट एअरवेज व अमेरिकेतील विमान कंपन्यांनी बंदी घातली आहे. प्रवाशांनी या बॅगांमधील बॅटरी काढून घ्यावी व त्यानंतरच त्या बॅगा नेऊ दिल्या जातील, असे या कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

स्मार्ट बँगांमध्ये विशिष्ट उपकरणे बसवलेली असतात. ब्लूस्मार्ट, रॅडन, अवे आदी कंपन्यांनी बनविलेल्या या बॅगांमधील ही उपकरणे मोबाईल चार्ज करू शकतात, तसेच त्यांत जीपीएस प्रणाली असते, जेणकरून बॅग हरविल्यास जीपीएसद्वारे तिचा ठावठिकाणा मिळू शकतो. त्याचप्रमाणे या बॅगांमध्ये भरलेल्या सामानेचे वजन ही बॅग स्वतःच डिस्प्लेवर दर्शविते. त्यामुळे या बॅगांना प्रवाशांची पसंती मिळत होती. तथापि आता विमान कंपन्यांनी सुरक्षेचे कारण पुढे करीत या बॅगा नेण्यास मनाई केली आहे. ही बंदी दि. 15 जानेवारीपासून अमलात येईल. 

बॅगेमधील उपकरणांमध्ये असलेल्या बॅटर्‍या उष्णतेने फुटतात, त्यांचे स्फोट होऊ शकतात व त्यामुळे आग लागण्याची भीती असते. त्यामुळे या बॅगा विमानाच्या सामान कक्षात नेण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. प्रवाशांनी बॅगेतील उपकरणांची बॅटरी काढून घेतली, तरीसुध्दा ती बॅग त्याला सामान कक्षातून न नेता केबिन लगेज म्हणूनच नेता येईल, असे जेट एअरवेजने स्पष्ट केले आहे. अर्थात अनेक बॅगांमधील उपकरणांच्या बॅटर्‍या काढता न येण्याजोग्या असतात.