Sat, Aug 17, 2019 17:16होमपेज › Pune › कौशल्य प्रशिक्षण नोकरी मिळण्याचे सुलभ साधन’

कौशल्य प्रशिक्षण नोकरी मिळण्याचे सुलभ साधन’

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 12:44AMपिंपरी : प्रतिनिधी

चांगले शिक्षण असूनदेखील आजच्या युवकांना मनासारखी नोकरी मिळत नाही. व्यक्‍तिमत्त्व विकास व कौशल्य याचे मूल्यमापन झाल्यावरच नोकरी मिळते. शिपाईपदासाठी पदवीधर, पीएच.डी.धारक युवक अर्ज करीत आहेत. अनुभवाची कमतरता असल्यामुळे योग्य नोकरी मिळत नाही. सुरुवातीला कमी पगाराची नोकरी स्वीकारून अनुभव मिळवावा  व त्यानंतर चांगल्या पगाराच्या नोकरीची अपेक्षा करावी; तसेच अनुभव मिळवून भविष्यात फूड, हेल्थ, हॉस्पिटॅलिटी, आर्ट अँड क्राफ्ट आदी क्षेत्रांमध्ये उद्योगाच्या संधी शोधाव्यात. कौशल्य प्रशिक्षण हेच चांगली नोकरी मिळण्याचे सोपे व सुलभ साधन असल्याचे प्रतिपादन आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विकास योजना विभागाकडील दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्या संयुक्‍त विद्यमाने रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, ‘अ’ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्राच्या सह संचालिका अनुपमा पवार, नगरसदस्य नामदेव ढाके, बाबू नायर, नगरसदस्या ममता गायकवाड, प्रियंका बारसे, अनुराधा गोरखे, अश्‍विनी बोबडे, सहायक आयुक्‍त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, नगरसचिव उल्हास जगताप, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, सहायक समाज विकास अधिकारी सुहास बहादरपुरे आदी उपस्थित होते. 

एकनाथ पवार म्हणाले, पूर्वी वर्तमानपत्र हे एकमेव नोकरीविषयक माहिती मिळण्याचे माध्यम होते. आज विविध माध्यमातून नोकरीविषयक माहिती उपलब्ध होते. त्याचा सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी फायदा करून घ्यावा. नोकरी करता करता युवकांनी उद्योग सुरू करण्याबाबतही  विचार करावा. रोजगार मेळाव्यातून युवकांना रोजगाराचे विविध पर्याय उपलब्ध होत आहेत. भविष्यात महापालिकेच्या वतीने उद्योजकांना चालना देण्यासाठीही मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल.8500 रिक्‍त पदांसाठी मुलाखती  या रोजगार मेळाव्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 80 विविध कंपन्यांमधील सुमारे 8500 रिक्‍त पदांसाठी हजारो उमेदवारांनी विवध कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास प्रतिनिधींकडे नोकरी मिळण्याचे अर्ज दाखल केले व मुलाखती दिल्या.