Sun, May 26, 2019 09:34होमपेज › Pune › पुणे : सोळा वर्षीय मुलीने पाण्याखाली केला योगा

पुणे : सोळा वर्षीय मुलीने पाण्याखाली केला योगा

Published On: Jun 21 2018 10:39AM | Last Updated: Jun 21 2018 10:38AMपुणे : प्रतिनिधी

खुशी परमार ही पुण्यातील १६ वर्षीय युवती स्कूबा डायव्हिंगच्या क्षेत्रात विविध टप्पे पार करत असताना आता नवीन विक्रमला गवसणी घातली आहे. तिने सलग तीन तास पाण्याखाली योगाची विविध आसने करीत हा विक्रम नोंदविला आहे. आशियाई विक्रमासाठी ही नोंद केली आहे. 

तिच्या नांवावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस, एशिया बुक ऑफ रेकॉर्डस, युनिक वर्ल्ड रेकॉर्डस, इंडियन यंग अचिव्हरचे विक्रम नोंदले गेले आहेत. पुण्याच्या टिळक तलावात पाण्याखाली योगासने करुन आशियाई विक्रम तिने आपल्‍या नावावर केला. 

Tags : InternationalYogaDay2018. pune, Yoga