होमपेज › Pune › सिंधुताईंचे ‘मदर ग्लोबल फाउंडेशन’

सिंधुताईंचे ‘मदर ग्लोबल फाउंडेशन’

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:21AM

बुकमार्क करा
पुणे :

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी नुकतीच ‘मदर ग्लोबल फाउंडेशन’ या  नावाची जागतिक स्तरावर काम करण्याचा उद्देश असलेली संस्था पुण्यासह धर्मादाय कार्यालयात स्थापन केली. अनाथ महिला आणि बालकांसाठी जागतिक स्तरावर काम करता यावे आणि आंतरराष्ट्रीय निधी संस्थेला मिळावा हा उददेश आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात त्यांना संस्थेचे प्रमाणपत्र देण्यात आले.  सिंधुताईंनी याआधीदेखील दोन ते तीन स्वयंसेवी संस्थांची स्थापना केली आहे.

त्याद्वारे त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सिंधुताई या रशियामध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांच्या संस्थेचे काम  पाहून काही संस्था प्रभावित झाल्या आणि त्यांनी मदत करण्यासाठी हात पुढे केला. सध्याच्या संस्थांचे कार्यक्षेत्र हे राज्यातील प्रादेशिक क्षेत्रापुरते मर्यादित असल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय निधी मिळण्यास अडचणी येत होत्या. म्हणून त्यांनी नवीन संस्था स्थापन केल्याची माहिती सिंधुताईंच्या निकटवर्तीय विनय यांनी दिली.