Tue, Jul 16, 2019 22:34होमपेज › Pune › रंगाने न्हाले नाथभक्‍त

रंगाने न्हाले नाथभक्‍त

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 1:09AMनारायणपूर : वार्ताहर

 बोपगाव (ता. पुरंदर) येथील श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावर रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. या वेळी हजारो भाविकांनी श्री कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेतले. मंगळवारी (दि. 6) पहाटे मंदिरात श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्टच्या वतीने पूजा, अभिषेक करण्यात आला. दुपारी 12 वाजता नाथांची आरती झाली. त्यानंतर साडेबारा वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रथम देवांच्या अंगावर रंग शिंपण्यात आला. मंदिराच्या शिखरावरून भाविकांच्या अंगावर रंगांची शिंपण करण्यात आली. या वेळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती. सर्व परिसर रंगांनी रंगून गेला होता. ‘रंगपंचमी आनंदोत्सव यात्रा’ उत्साहात झाली.

मंगळवारी सकाळी 9 वाजता बोपगाव येथून पालखी-काठी वाजत कानिफनाथ मंदिरावर गेली. त्यानंतर सासवड, भिवरी, गराडे, चांबळी, औताडवाडी, होळकरवाडी, वडकी, उरुळीदेवाची येथील मानाच्या शिखर काठ्यांनी रंगपंचमी आनंदोत्सव यात्रेत सहभाग घेतला. श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानोबा फडतरे, उपाध्यक्ष बापूसाहेब फडतरे, सचिव  जयवंत फडतरे, खजिनदार भानुदास फडतरे ,सदस्य शिवाजी जगदाळे, नामदेव फडतरे, प्रकाश का. फडतरे, नाना फडतरे, आनंदराव फडतरे, प्रकाश आप्पा फडतरे   व ग्रामस्थ बोपगाव यांच्या वतीने ‘रंगपंचमी आनंदोत्सव यात्रा’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश फडतरे, डेक्कन मर्चंट बँकेचे संचालक दयानंद फडतरे, बोपगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य, ‘रंगपंचमी आनंदोत्सव यात्रा’ यशस्वी होण्यासाठी नियोजन केले.