होमपेज › Pune › राणेंना शिवसेनेचा विरोध नव्हता : दानवे

राणेंच्या उमेदवारीला सेनेचा विरोध नव्हता : दानवे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पक्षाचे निष्ठावंत आणि बाहेरून आलेले नेते यांना संधी देण्यात आम्ही समतोल साधत असतो. त्यामुळेच राज्याचे भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. या जागेसाठी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध नव्हता. मुळात रिक्त जागाच युतीची नव्हती, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. 

भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, 'कर्जमाफीत दिरंगाई झाली. त्याला काही तांत्रिक कारणे आहेत. राज्यात काही शेतकरी लाभार्थी आहेत. पण, बाकीचे या महिन्यात होतील.' शिवसेना-भाजप मतभेदांबाबत दानवे म्हणाले, 'आमचे आणि शिवसेनेचे संबंध खूप चांगले आहेत. भांडणे माध्यमांमध्ये आहेत.'

भाजपने पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दानवे यांनी सांगितले. ते म्हणाले, 'राज्याच्या सहा विभागांप्रमाणे भाजपच्या विभागीय बैठका सुरू आहेत. त्यात २८८ मतदारसंघात २८८ पक्ष विस्तारक आहेत. गेली सहा महिने ते यासाठी पूर्णवेळ काम करणार आहेत. विस्तारक गावात जाऊन "वन बूथ २५ यूथ" असे २५ कार्यकर्ते तयार करत आहेत.या २५ कार्यकर्त्यांना मुंबईत वॉर रूममध्ये प्रशिक्षण देणार आहे. यातून ९१ हजार बुथपर्यंत जाण्याचा भाजपचा संकल्प आहे.'