होमपेज › Pune › शास्तीकराच्या विरोधात शिवसेना मोर्चा काढणार 

शास्तीकराच्या विरोधात शिवसेना मोर्चा काढणार 

Published On: Apr 09 2018 6:02PM | Last Updated: Apr 09 2018 6:02PMपिंपरी प्रतिनिधी 

अनधिकृत बांधकामांना लावलेला शास्तिकर पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा काढणार आहे त्यासाठी पंधरा दिवस जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली शासन पंधरा दिवसात शस्तिकर रद्द करण्याचा  निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे मग मुहूर्ताची वाट पाहून लोकांना वेठीस का धरता असा सवाल त्यांनी केला पंधरा दिवसात योग्य तो निर्णय न घेतल्यास पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला

महापालिकेतील गटनेते कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस आमदार गौतम चाबुकस्वार ,शहरप्रमुख योगेश बाबर ,महिला शहर संघटिका सुलभा उबाळे ,गटनेते राहुल कलाटे, माजी शहरप्रमुख भगवान वाल्हेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बारणे म्हणाले की ,पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामांची संख्या मोठी आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा आदेश काढला. मात्र अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या अटी शर्ती व दंड जाचक आहे. त्यामुळे सर्वसाधारण नागरिक अर्ज करण्यास धजावत नाहीत. साहजिकच बांधकामे नियमितीकरण कागदावरच आहे. अनधिकृत बांधकामे नियमित व्हावीत व शस्तिकर रद्द व्हावा यासाठी सेनेने आग्रही भूमिका घेतली मोर्चे काढले. 

मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला पण उपयोग झालेला नाही. अनधिकृत बांधकामांना पालिका मिळकत कराच्या दुप्पट शस्तिकर लावते थकीत शस्तिकर सम्पूर्ण भरल्याशिवाय मिळकत कर भरून घेतला जात नसल्याने पालिकेचेही नुकसान होत आहे. शस्तिकर माफीच्या केवळ घोषणा झाल्या पण माफी प्रत्यक्षात आली नाही शहरातील नागरिकांकडून जबरदस्तीने शस्तिकर भरून घेतला जात आहे येत्या पंधरा दिवसात शस्तिकर माफीचा निर्णय न घेतल्यास शिवसेना पालिकेवर मोर्चा काढेल असा इशारा बारणे यांनी दिला

पोलीस स्टेशन हप्ते वसुलीची केंद्रे 

नगरमधील शिवसेनेच्य दोन कार्यकर्त्यांचा गेलेला बळी दुर्दैवी आहे राजकीय कटुता इतक्या खालच्या स्तराला जाऊ नये राजकारणाचे गुन्हेगारीकरण चिंतेची बाब आहे गुन्हेगारांचे पोशिंदें बडे व्यक्ती आहेत पिम्परी चिंचवडमध्ये ही गुन्हेगारी वाढत आहे पोलीस स्टेशन ही हप्ते वसूल करणारी केंद्रे बनली आहेत सर्वसामान्य माणूस तक्रार करायला गेला की त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात असा आरोप बारणे यांनी केला.

Tags : Shivsena, Protest,Pimpari Chinchwad municipal corporation, Shastikar, iligal construction