Sun, Aug 25, 2019 13:09होमपेज › Pune › महाराष्ट्र केसरीसाठी पुणे जिल्ह्यातून शिवराज  राक्षे, मुन्ना झुंजुरकेची निवड

महाराष्ट्र केसरीसाठी पुणे जिल्ह्यातून शिवराज  राक्षे, मुन्ना झुंजुरकेची निवड

Published On: Dec 04 2017 1:36AM | Last Updated: Dec 04 2017 12:15AM

बुकमार्क करा

खडकवासला : वार्ताहर 

सिंहगड रोडवरील  नांदेडसिटी गेटसमोरील  वस्ताद रामभाऊ कारले मैदानात आयोजित केलेल्या   महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्त्या पाहण्यासाठी हजारो कुस्तीशौकीनांनी गर्दी केली होती. रंगतदार लढतीने सर्वांचे लक्ष वेधले. महाराष्ट्र केसरीसाठीच्या अंतिम लढतीत गादी विभागात मावळच्या  शिवराज राक्षे  यांने शिरूरच्या सचिन येलभर याच्यावर, तर माती विभागात मुळशीच्या मुन्ना झुंजुरके याने बारामतीच्या भारत मदने याच्यावर  गुणांनी मात केली.

खासदार युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. बक्षीस वितरण आमदार भीमराव तापकीर, माजी आमदार बापू पठारे, माजी खासदार अशोक मोहोळ, शुक्राचार्य वांजळे, जिल्हा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संदीप भोंडवे, योगेश दोडके, अमोल बुचडे, मंगलदास बांदल, विकास दागंट, श्रीरंग चव्हाण आदींच्या हस्ते करण्यात आले. संयोजन  हवेली तालुका कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष उमेश कारले, नांदेड सिटीचे  संचालक विकास लगड, किशोर माने, गणेश घुले, रमेश लगड यांच्यासह नांदेड ग्रामस्थांनी केले.

स्पर्धेचा निकाल : गादी विभाग : 57 किलो :स्वप्निल शेलार (बारामती) विजयी विरुद्ध अजिंक्य भिलारे (मुळशी). 61 किलो : तुकाराम शितोळे (हवेली) विजयी विरुद्ध अतिष आडकर ( मावळ). 65 किलो: सागर लोंखड(खेड) विजयी विरुद्ध  आबा शेडगे (शिरूर ). 70 किलो : दिनेश मोकाशी ( बारामती ) विजयी विरुद्ध अक्षय चव्हाण ( दौंड ). 74 किलो: बाबासाहेब डोंबळे (इंदापूर ) विजयी विरुद्ध गौरव शेटे ( भोर ). 79 किलो: अक्षय चोरघे ( हवेली ) विजयी विरुद्ध मंजूर शेख (इंदापुर ). 86 किलो : अनिकेत खोपडे (भोर)  विजयी विरुद्ध सचिन रेणुसे (वेल्हे). 92 किलो: केदार खोपडे (भोर )विजयी विरुद्ध विक्रम पवळे (मुळशी).

97 किलो: आदर्श गुंड (खेड) विजयी विरुद्ध सोनबा काळे (हवेली). माती विभाग : 57 किलो: सागर मारकड (इंदापूर) विजयी विरुद्ध सागर भेगडे  (मावळ). 61 किलो : सुरज कोकाटे (इंदापूर) विजयी विरुद्ध देविदास निंबणे (मावळ). 65 किलो : अनिल कचरे (इंदापूर) विजयी विरुद्ध पोपट पालवे  (बारामती). 70 किलो : अरुण खेंगले (खेड) विजयी विरुद्ध स्वप्निल दोन्हे ( दौंड). 74 किलो : इमरान शेख (इंदापूर) विजयी विरुद्ध अमोल धरपाळे (वेल्हे). 79 किलो : नागेश राक्षे (मावळ) विजयी विरुद्ध सद्दाम जमादार (इंदापूर). 86 किलो : तुषार पवार (इंदापूर) विजयी विरुद्ध संतोष पडळकर  (बारामती). 92 किलो : विक्रम घोरपडे (इंदापूर) विजयी विरुद्ध शंकर माने (बारामती). 97  किलो : विकास येनपुरे (मावळ) विजयी विरुद्ध अभिजित जामदार (भोर).