Mon, Mar 25, 2019 09:10होमपेज › Pune › आरतीतून केले जाते शिवरायांना वंदन

आरतीतून केले जाते शिवरायांना वंदन

Published On: Feb 19 2018 1:37AM | Last Updated: Feb 19 2018 12:38AMकात्रज : वार्ताहर

जयदेव जयदेव जय शिवराया आरती तुज दाविले राया या आरतीच्या स्वराने कात्रजच्या नानासाहेब पेशवे तलावातील अश्‍वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ‘शिववंदना’ देण्यात  आली. शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने दररोज सायंकाळी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले जात आहे. शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी 13 मार्च 2017 पासून दररोज सायंकाळी सव्वा सात वाजता शिववंदना दिली जाते. पुतळा स्वछ करणे, पुष्पहार अर्पण करून शिवरायांची आरती केली जात आहे. 

महाराजांचे कार्य आणि विचार समोर ठेऊनच प्रतिष्ठाणची स्थापना करण्यात आली. छत्रपतींचे कार्य, विचार आणि इतिहास हा जनतेच्या मनात कायम बिंबवून राहावा. यासाठी शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. प्रतिष्ठानतर्फे भविष्यात गड - किल्ले संवर्धन मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम यांनी सांगितले. निलेश खामकर, किरण खामकर, अक्षय दीक्षित, अक्षय जाधव, नवनाथ पवार, अखिल नायर, शुभम पाटील नित्यनेमाने शिववंदनेत सहभागी होतात.