Mon, Sep 24, 2018 01:51होमपेज › Pune › भाविकांची शिवमंदिरात गर्दी

भाविकांची शिवमंदिरात गर्दी

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 20 2018 10:25PMपिंपरी : प्रतिनिधी 

शहरातील सर्वच शिवमंदिरांमध्ये दुसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त पावसाच्या सरींतही भाविकांची पहाटेपासूनच मंदिरात रीघ लागली होती. श्रावणी सोमवारमुळे भाविकांनी मनोभावे शिवमंदिरात हजेरी लावून शंकराच्या पिंडीवर बेल, फुले आणि दूध वाहून शंकराची आराधना केली. कालपासून पावसाची रिपरिप सुरू असूनही भक्तांनी मंदिरात जाण्यावर भर दिला.
पिंपळे सौदागर तसेच शहरातील इतर मंदिरे भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलून गेली होती. श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी वाढल्याने जणू जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.  मंदिरात खास फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिरांमध्ये अभिषेक, पूजा, महाआरतीसह कीर्तन, भजनाचे कार्यक्रम आयोजिले होते. धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचा लाभही भक्तांनी घेतला.