Mon, May 20, 2019 18:30होमपेज › Pune › शिवसेनेने भाजपासोबत निवडणूक लढवावीः आठवले

शिवसेनेने भाजपासोबत निवडणूक लढवावीः आठवले

Published On: Apr 19 2018 8:08PM | Last Updated: Apr 19 2018 8:08PMपुणेः प्रतिनिधी

आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणुक लढवावी अशी माझी भूमिका असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. शिवसेनेने भाजपापासून वेगळ होणं शिवसेनाच्या फायद्याचे नाही. काही वाद असतील तर ते सेना-भाजपाने एकत्र बसवून मिटवले पाहिजेत. यासंदर्भात आपले पंतप्रधानांशी देखील बोलने झाले आहे. पुण्यात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आठवले म्हणाले, काँग्रेस फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करत आहे. राहुल गांधी हे मोदींना दलित विरोधी असल्याचे म्हणत असले तर मोदी दलित विरोधी नाहीत. देशातील बदलत्या राजकीय पार्श्‍वभूमीवर पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत सत्तापालटाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत. 

शिवेसना आणि भाजपा यांची युती झाली नाही तर मी रामटेक मतदारसंघातून लोकसभा लढवेन. त्यासंदर्भात नितीन गडकरी यांच्याशी बोलणे झाले आहे. तसेच शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर मी मुंबईतून लोकसभेसाठी निवडणूक लढवेन. कोरेगाव भीमा प्रकरण आणि विविध संघटनांवरील छाप्यांबाबत आठवले यांना विचारले असता, संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव प्रकरणात सहभाग आहे का याचा अभ्यास पोलिसांनी करावा. संभाजी भिडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. तसेच इतर कोणी या कटात सहभागी आहेत का याचीही चौकशी करावी असे ते म्हणाले.