होमपेज › Pune › पुण्यातही दुमदुमला भिडे गुरूजी निर्दोषचा आवाज

पुण्यातही दुमदुमला भिडे गुरूजी निर्दोषचा आवाज

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बुधवारी भिडे गुरूजी यांच्या समर्थनार्थ शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, परवानगी नाकारण्यात आल्याने नदीपात्रात ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित धारकऱ्यांनी ‘भिडे गुरूजी निर्दोष है, मिलींद एकबोटेंवरील गुन्हे मागे घ्या, अशी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी नंदकिशोर एकबोटे, खासदार प्रदीप रावत, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुणे जिल्हा कार्यवाहक पराशर मोने व अन्य उपस्थित होते.

राहुलला न्याय मिळावा

राहुलच्या मृत्यूला दोषी असणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली. माझा मुलगा मराठा होता म्हणून मारलं का?त्याला एवढं मारलं की मारूनच टाकलं. राहुलच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, कोरेगाव भीमा प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडे यांची आई जनाबाई फटांगडे यांची मागणी 


मोर्चाने राखले समाजभान

पुण्यात रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी समाजभान जपले. इतक्या गर्दीतही मोर्चा अगदी शांततेत सुरू असताना एक रूग्णावाहिका समोर आली. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी रूग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. 

Tags : Shiv Pratishthan, Hindustan, Rally, Support, Sambhaji Bhide, Shaniwar Wada,pune, koregao Bhima


  •