Wed, Jan 23, 2019 19:01होमपेज › Pune › मावळमध्ये होणार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन

मावळमध्ये होणार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 06 2018 1:03AM

बुकमार्क करा
शिरगाव : वार्ताहर 

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित 43 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आंबी(तळेगाव दाभाडे) येथील डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये दि. 18 ते 20 जानेवारीदरम्यान  होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी दिली.  या प्रदर्शनासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, बारामती, शिरूर, हवेली, जुन्नर आणि इतर सर्व तालुक्यातील उत्कृष्ट 182 प्रकल्प या प्रदर्शनात सादर करण्यात येणार आहेत.

हे प्रकल्प पर्यावरण, सामान्य विज्ञान, अभियांत्रिकी, मानवी आरोग्य  यावर आधारित  असणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी खुले राहणार असून विविध शास्त्रज्ञांची व्याख्याने देखील या प्रदर्शनात आयोजित करण्यात आली आहेत, असेही राक्षे यांनी सांगितले .यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी निलेश धानापुने, मावळ तालुका मुख्याध्यापाक संघाचे अध्यक्ष राजेश गायकवाड, सचिव बी. बी. पाटील, डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद  कुलकर्णी, विज्ञान अध्यापाक संघाचे जिल्हा समन्वयक वसंत बुरांडे, मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश सुतार, डी वाय पाटील पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे साम्नवयक प्राध्यापक संदीप अवचर,आमदार प्रकाश देवळे विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश फरताडे,विठ्ठल माळशिकारे,नारायण पवार,क्षीरसागर, चेतन मोरे आदी उपस्थित होते.