Thu, Feb 21, 2019 01:23होमपेज › Pune › शिल्पा शेट्टी, नेहा धुपियाने केले बिटकॉईनचे प्रमोशन!

शिल्पा शेट्टी, नेहा धुपियाने केले बिटकॉईनचे प्रमोशन!

Published On: Jun 12 2018 1:46AM | Last Updated: Jun 12 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी

देशभरात धुमाकूळ घालणार्‍या अभासी चलनाच्या (बिटकॉईन) प्रमोशनसाठी बॉलिवूडची तारका नेहा धुपिया आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांचा इव्हेंट आयोजित करून, नागरिकांना आकर्षित केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील 25 नागरिकही दुबई आणि सिंगापूर येथे झालेल्या या इव्हेंटला गेल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांना या इव्हेंटचे फोटो मिळाले असून, गरज भासल्यास दोघांकडेही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पुणे शहरातील दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात बिटकॉईन फसवणूक प्रकरणात दोन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणाचा पोलिसांनी तपास करून मुख्य आरोपी अमित महेंद्रकुमार भारद्वाज, त्याचा भाऊ आणि इतर नऊ जणांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत होती. या चौकशीत वरील धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. 

अभासी चलनात  पुणे शहरात जवळपास एक हजार नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अनेकजण फसवणूक होऊनही, अडकण्याच्या भीतीने समोर आलेले नाहीत. मात्र, याघटनेनंतर देशभरात खळबळ उडाली. अनेक बड्या हस्तींनी यात पैसे गुंतविल्याचेही समोर आले होते. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती व उद्योगपती राज कुंद्रा यांची याप्रकरणात चौकशीही केली होती.

दरम्यान पुणे पोलिसांनी दिल्लीतून अमित भारद्वाज याला अटक केल्यानंतर अनेक बाबीचे खुलासे होत आहेत.नागरिकांना आकर्षित करण्यासाठी अमित भारद्वाज आणि त्याचा साथीदारांनी इव्हेेंट आयोजित केले. त्याठिकाणी गुंतवणूकदार व सिनेतारकांना बोलविण्यात आले. यातील पहिला इव्हेट सिंगापूर येथे 2016 साली घेण्यात आला. त्यासाठी सिनेतारका नेहा धुपियाला बोलावले होते. सिंगापूरमधील इव्हेटला पुण्यातील 10 गुंतवणूकदार गेले होते. 

तर, 2017 मध्ये दुबईत इव्हेेंट कट्टा म्हणून कार्यक्रम घेऊन राज कुंद्रा यांना बोलविले होते. पुण्यातून दुबईत 15 जण गेल्याचे समोर आले आहे. या इव्हेेंटचे फोटो पुणे पोलिसांना मिळाले आहेत. दरम्यान, याप्रकरणाच्या तपासात गरज भासल्यास या दोघांकडेही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक मनिषा झेडे यांनी दिली. आरोपींकडे आतापयर्र्ंत 84 हजार बिटकॉईन संदर्भात 84 हजार युजर आयडी तयार झाले आहेत. त्यात जवळपास 90 ते 95 हजार बिटकॉईन जमा झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.