Sun, May 26, 2019 01:29होमपेज › Pune › शरद पवार भावी राष्ट्रपती : सुशीलकुमार शिंदे 

शरद पवार भावी राष्ट्रपती : सुशीलकुमार शिंदे 

Published On: Dec 30 2017 1:30PM | Last Updated: Dec 30 2017 3:00PM

बुकमार्क करा
पुणे प्रतिनिधी :

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रतिभा पाटील यांच्या हस्ते जरी आज सत्कार होऊ शकला नसला. तर या व्यासपीठावर शरद पवार हे भावी राष्ट्रपती आहेत असे सुशीलकुमार सांगताच व्यासपीठावर असलेले शरद पवार यांनी लगेच नकारार्थी हात दखवला. मात्र हाच त्यांचा होकार आहे असे सांगत मीच त्यांच्या करंगळीला धरून राजकारणात आलो असल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला.

प्रतिभा पाटील जीवनगौरव ग्रंथ समितीतर्फे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याच्या कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या जीवनावर आधारित भारताची प्रतिभा या जीवनगौरव ग्रंथ, संकेतस्थळाचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते.