Mon, Mar 25, 2019 13:13होमपेज › Pune › पवार प्रोसेसिंग करणार्‍यांचे नेते : प्रकाश आंबेडकर 

पवार प्रोसेसिंग करणार्‍यांचे नेते : प्रकाश आंबेडकर 

Published On: Jun 05 2018 1:28AM | Last Updated: Jun 05 2018 1:00AMपुणे : प्रतिनिधी

शरद पवार हे शेतकर्‍यांचे नेते नसून, ते शेतकर्‍यांनी पिकवलेल्या धान्यावर प्रक्रिया करणार्‍यांचे नेते आहेत, असा टोला भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. आजपयर्र्ंत फक्त यशवंतराव चव्हाण यांनी शेतकर्‍यांविषयी कळवळा दाखविला आहे. त्यानंतर आलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याने शेतकर्‍यांचा विचार केला नाही, असेही ते म्हणाले. चोंडी येथील गोंधळासंदर्भात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी अ‍ॅड. विजय मोरे, लक्ष्मण माने उपस्थित होेते.  सरकारने 10 जूनपर्यंत चोंडीतील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेऊन सोडून द्यावे, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही अ‍ॅड. आंबेडकर यांनी दिला. भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या धनगर समाज आरक्षणाच्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.