Wed, Apr 24, 2019 15:32होमपेज › Pune › तरुणीवर लैंगिक अत्याचार 

तरुणीवर लैंगिक अत्याचार 

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 12:48AMपुणे :  प्रतिनिधी 

पहिले लग्न झालेले असताना तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार व अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर तिला पळवून नेऊन खोट्या गुन्ह्यात अडकवून बदनामी करण्याची धमकी दिली. तिच्याशी लग्न केले. त्यानंतर घऱात कुणीही नसताना सासर्‍यानेही तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेगाव खुर्द येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणासह त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी पीडित 20 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज रांगा कुलातून, रांगा कुलातून व इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज रांगा कुलातून याचे पूर्वी लग्न झाले आहे. तरीही त्याने  2015-16 मध्ये पीडितेचा रस्ता अडवून तिला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी त्याच्या फ्लॅटवर नेऊन बलात्कार केला. तसेच अनैसर्गिक अत्याचारदेखील केले. त्यानंतर पीडित तरुणीचे वडील त्याच्या घरी गेल्यावर घरातील राकेश व संदीप यांनी त्यांना तुमच्या मुलीला पळवून घेऊन जाऊन तुम्हाला खोट्या केसमध्ये फसवू.  तुमच्या खानदानाची तुमच्या समाजात बदनामी करून टाकू अशी धमकी दिली.

त्यानंतर सूरजने तिच्या शाळेचा दाखला घेऊन जाऊन त्यावर तिचे वय वाढवून आणले आणि तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर त्याची आई सती कुलातून व वहिनी रूपाली यांनी वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास दिला. तर सासरा रांगा कुलातून यांनी घरात कोणी नसताना तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराला वैतागून तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.