Mon, Sep 24, 2018 05:14होमपेज › Pune › पुण्यातील वाकडमध्ये तरुणीवर लैंगिक अत्‍याचार

पुण्यातील वाकडमध्ये तरुणीवर लैंगिक अत्‍याचार

Published On: Apr 23 2018 2:23PM | Last Updated: Apr 23 2018 2:22PMपिंपरी : प्रतिनिधी 

दगड कापण्याची मशीन पाहिजे असे सांगून घरात घुसलेल्या एकाने सोळा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. हा धक्कादायक प्रकार वाकड येथे रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घडला.

या प्रकरणी 24 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. तर ओळखीच्या एका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादिची नातेवाईक मुलगी रविवारी घरी एकटीच होती. त्यावेळी ओळखीचा युवक घरी आला. दगड कापण्याची मशीन पाहिजे असे सांगून घरात घुसला. त्यानंतर त्याने मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचर केले. तपास वाकड पोलिस करत आहेत.