Fri, Jul 19, 2019 07:06होमपेज › Pune › अल्‍पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणार्‍याला चार वर्ष सक्तमजुरी

अल्‍पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणार्‍याला चार वर्ष सक्तमजुरी

Published On: May 04 2018 9:26PM | Last Updated: May 04 2018 9:26PMपुणे : प्रतिनिधी 

आई-वडील कामाला गेले असताना सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या एकाला विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी चार वर्ष सक्तमजुरी आणि तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

अक्षय उर्फ आकाश वसंत दळवी (२१, रा. शिरूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. दि. १८ मार्च २०१५ रोजी शिरूर येथे हा प्रकार घडला. पिडीत मुलीचे वडील हे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीस असून पिडीत मुलीची आई एका दुकानात कामाला होती. घटनेच्या दिवशी मुलीची आई जेवणासाठी घरी आल्यानंतर पिडीत मुलीबरोबर अक्षय अश्‍लिल चाळे करत असताना सापडला होता. त्यानंतर याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी साक्षीदार तपासताना शिक्षा देण्याची मागणी केली. खटल्यात पिडीत मुलीची साक्ष, आईची साक्ष महत्वाची ठरली. 

खटल्यात आरोपी दळवीला दोषी असल्याचे सांगण्यात आल्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयाने त्याच्या वयाचा विचारकरून सहानभुतीपूर्वक विचार करून त्याची मुक्तता करण्याची मागणी केली. परंतु, खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दाखला दिला. त्यावर न्यायालयाने महिलांवर होत असलेले अत्याचार वाढत असताना दुसरीकडे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍याला दया दाखवता येणार नसल्याचे मत नोंदविले. न्यायालयाने विनयभंग तसेच पोक्सोच्या कलम ७ आणि ८ नुसार ४ वर्ष सक्तमजुरी आणि २ हजार दंड तर जबरदस्तीने घरात घुसल्याप्रकरणी सहा महिने सक्तमजुरी आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.