Mon, Aug 19, 2019 04:55होमपेज › Pune › टॅटू काढण्याच्या बहाण्याने महिलेवर लैंगिक अत्याचार

टॅटू काढण्याच्या बहाण्याने महिलेवर लैंगिक अत्याचार

Published On: Jun 15 2018 1:24AM | Last Updated: Jun 15 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी 

टॅटू काढण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार केला. या अत्याचाराचे चित्रीकरण करत ते व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा वर्षभर बलात्कार केला. महिलेने भेटण्यास नकार दिल्यावर अश्‍लील फोटो व  मेसेज पाठवून बदनामी केली. 

एवढेच नव्हे तर आरोपीच्या पत्नीने गर्भपाताच्या गोळ्या सेवन करण्यास भााग पाडून गुंडांकरवी जिवे मारण्याची धमकी  दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला असून, सिंहगड पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे, तर धायरीतील प्रशांत श्रीवास्तव याला अटक करण्यात आली आहे, तर पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला एक वर्षापूर्वी श्रीवास्तव याने धायरी येथील दुकानात टॅटू काढण्याच्या बहाण्याने नेले. तेथे तिला बेशुद्ध होण्याचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्याने या सर्व प्रकाराचे चित्रीकरण केले आणि त्याचे फोटोही काढले. ते फोटो महिलेला दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार लॉज, तसेच महिलेच्या घरी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर महिलेने त्याला भेटण्यास नकार दिला.

त्यावेळी त्याने ते फोटो व चित्रीकरण जवळपास 150 लोकांना पाठवून तिची बदनामी केली; तसेच याची माहिती त्याच्या पत्नीला होती. तरी तिने हे सर्व व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या मोठ्या रकमेला विकण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर 6 जून रोजी महिलेला दुकानात बोलवून श्रीवास्तव याच्या पत्नीने माझ्या नवर्‍याविरोधात तक्रार देऊ नकोस नाही तर तुला माझ्या गँगमधील पोरांना लावून जिवे मारून टाकेन, अशी धमकी देत मारहाण केली. या प्रकारानंतर महिलेने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास सिंहगड पोलिस 
करीत आहेत.