Mon, Jun 24, 2019 21:55होमपेज › Pune › लोहगाव येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

लोहगाव येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Published On: May 13 2018 2:16AM | Last Updated: May 13 2018 1:37AMपुणे : प्रतिनिधी 

लोहगाव येथील एका लॉजमध्ये चालविल्या जाणार्‍या सेक्स रॅकेटचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. लॉज मालक, मॅनेजरसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत चार मुलींची सुटका करण्यात आली. 

दीपक ऊर्फ  दिपेंद्र गोविंदी प्रसाद (वय 27, रा. मध्यप्रदेश), लॉजमालक दगडू सुदाम खांदवे (रा. लोहगाव), लॉजचा मॅनेजर मनोज प्रभुदयाल दोहरे (वय 29, रा. मध्यप्रदेश) आणि भीमराव हेमेंद्र दोहरे (वय 20, रा. मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यातील मनोज दोहरे आणि भीमराव दोहरे यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

लोहगाव परिसरातील एका लॉजमध्ये परराज्यातील आणि महाराष्ट्रातील मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभाग आणि विमानतळ पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करताना सेक्स रॅकटेचा पर्दाफाश केला आहे. त्यात परराज्यातील आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन मुलींची सुटका करण्यात आली. यावेळी 35 हजार रुपयांची रक्कम, 7 मोबाईल फोन, कागदपत्रे असा ऐवज जप्त करण्यात आला. या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिस नाईक सचिन कदम यांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय पाटील, अधिकारी आणि कर्मचारी आणि विमानतळ पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी संयुक्तपणे छापा टाकला. त्यात मनोहर दोहरे आणि भीमराव दोहरे यांना ताब्यात घेण्यात आले.